भिवंडीत दोन दिवसांत १८ लाखांची करवसुली
भिवंडी: सोनाळा ग्रामपंचायत हद्दीतील मालमत्ता कराची थकीत वसुली करण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. थकीत मालमत्ता करधारकांवर वसुलीसाठी जप्ती कारवाईला सुरुवात केली आहे.
या कारवाईचा धसका घेऊन ग्रामपंचायतीने दोन दिवसांत १८ लाख रुपयांची थकीत करवसुली केली आहे. तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक गोदाम मालमत्ताधारक आहेत.
या मालमत्ता कराची थकबाकी कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. सध्या ग्रामपंचायतीची १ कोटी ३२ लाख रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे. थकीत कराची वसुली होत नसल्याने त्याचा परिणाम ग्रामपंचायतीच्या विकासकामांवर होऊन कामे ठप्प होत आहेत. ही बाब गांभीर्याने घेत सरपंच मनीषा मोरे यांनी सर्व ग्रामपंचायत प्रशासन व लोकप्रतिनिधी, कर्मचाऱ्यांना विश्वासात घेत दोन दिवसांपासून मालमत्ता कर वसुलीसाठी मोहीम सुरू केली आहे.

Comments
Post a Comment